पदक माळा सकलाद । तेथें टाकिली गोविंदें ॥१॥ देव तांतडी निघाले । वाकळ घेउनी पळाले ॥२॥ भक्त येती महाद्वारीं । चोर पडले देव्हारीं ॥३॥ नवल झालें पंढरपुरीं । देव राबे दासी घरीं ॥४॥ त्रिभुवनांत मात गेली । दासी जनी प्रगटली ॥५॥