पदक माळा सकलाद – संत जनाबाई अभंग – ७३
पदक माळा सकलाद ।
तेथें टाकिली गोविंदें ॥१॥
देव तांतडी निघाले ।
वाकळ घेउनी पळाले ॥२॥
भक्त येती महाद्वारीं ।
चोर पडले देव्हारीं ॥३॥
नवल झालें पंढरपुरीं ।
देव राबे दासी घरीं ॥४॥
त्रिभुवनांत मात गेली ।
दासी जनी प्रगटली ॥५॥