Categories: जनाबाई

जिव्हा लागली नामस्मरणीं – संत जनाबाई अभंग – ६९

जिव्हा लागली नामस्मरणीं – संत जनाबाई अभंग – ६९

जिव्हा लागली नामस्मरणीं ।
रित्या मापें भरी गोणी ॥१॥
नित्य नेमाची लाखोली ।
गुण आज्ञेनें मी पाळीं ॥२॥
मज भरंवसा नामाचा ।
गजर नामाच्या दासीचा ॥३॥
विटेवरी ब्रह्म दिसे ।
जनी त्याला पाहतसे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जिव्हा लागली नामस्मरणीं – संत जनाबाई अभंग – ६९