Categories: जनाबाई

राधा आणि मुरारी – संत जनाबाई अभंग – ६६

राधा आणि मुरारी – संत जनाबाई अभंग – ६६


राधा आणि मुरारी ।
क्रीडा कुंजवनीं करीं ॥१॥
राधा डुल्लत डुल्लत ।
आली निजभुवनांत ॥२॥
सुमनाचे सेजेवरी ।
राधा आणि तो मुरारी ॥३॥
आवडीनें विडे देत ।
दासी जनी उभी तेथ ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

राधा आणि मुरारी – संत जनाबाई अभंग – ६६