पुंडलिकापाशीं । नामा उभा कीर्तनासी ॥१॥ येऊनियां पांडुरंगें । स्वयें टाळ धरी अंगें ॥२॥ गाऊं लागे बरोबरी । नाहीं बोलायाची उरी ॥३॥ स्वर देवाचा उमटला । दासी जनीनें ओळखिला ॥४॥