नामदेवा पुत्र झाला – संत जनाबाई अभंग – ६२
नामदेवा पुत्र झाला ।
विठो बारशासी आला ॥१॥
आंगडें टोपडें पेहरण ।
शेला मुंडासा घेऊन ॥२॥
माझ्या जीवाच्या जीवना ॥ नाम ठेवी नारायणा ॥३॥
जनी म्हणे पांडुरंगा ।
नांव काय ठेवूं सांगा ॥४॥
नामदेवा पुत्र झाला ।
विठो बारशासी आला ॥१॥
आंगडें टोपडें पेहरण ।
शेला मुंडासा घेऊन ॥२॥
माझ्या जीवाच्या जीवना ॥ नाम ठेवी नारायणा ॥३॥
जनी म्हणे पांडुरंगा ।
नांव काय ठेवूं सांगा ॥४॥
अभंगाचा भावार्थ: भक्त शिरोमणी नामदेवरायांना पुत्रप्राप्ती झाली आणि त्याच्या बारशाच्या कार्यक्रमासाठी साक्षात वैकुंठाधीपती भगवान श्री पंढरीनाथ आले. सोबत येताना आंगडे, टोपडे, शेला आणि मुंडासा या सर्व वस्तू बाळासाठी प्रेमाने घेऊन आले. जनाबाई म्हणतात की हे जगज्जीवना , हे प्राणप्रिया नारायणा या बाळाचे आम्ही कोणते नाव ठेवावे ते पांडुरंगा आता तुम्हीच आम्हाला सांगा.