नामदेवाचे घरीं । चौदाजण स्मरती हरी ॥१॥ चौघेपुत्र चौघी सुना । नित्य स्मरती नारायणा ॥२॥ आणिक मायबाप पाही । नामदेव राजाबाई ॥३॥ आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी । पंधरावी ती दासी जनी ॥४॥