Categories: जनाबाई

शेटया झाला हरी – संत जनाबाई अभंग – ५४

शेटया झाला हरी – संत जनाबाई अभंग – ५४


शेटया झाला हरी ।
द्रव्य गोणी लोटी द्वारीं ॥१॥
बुद्धि सांगे राजाईसी ।
तुह्मी न छळावें नाम्यासी ॥२॥
अवघ्या वित्तासी वेंचावें ।
सरल्या मजपासीं मागावें ॥३॥
विठ्‌ठलशेट नाम माझें ।
नामयाला सांगावें ॥४॥
आतां उचित दासी ।
ऐसें बोले राजाईसी ॥५॥
ऐसे बोलोनियां गेला ।
म्हणे जनी नामा आला ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शेटया झाला हरी – संत जनाबाई अभंग – ५४