Categories: जनाबाई

जनी जाय पाणीयासी – संत जनाबाई अभंग – ५३

जनी जाय पाणीयासी – संत जनाबाई अभंग – ५३


जनी जाय पाणीयासी ।
मागें धांवे ह्रुषिकेशी ॥१॥
पाय भिजों नेदी हात ।
माथां घागरी वहात ॥२॥
पाणी रांजणांत भरी ।
सडासारवण करी ॥३॥
धुणें धुऊनियां आणी ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जनी जाय पाणीयासी – संत जनाबाई अभंग – ५३