एक प्रहर रात्र झाली – संत जनाबाई अभंग – ५२
एक प्रहर रात्र झाली ।
फेरी विठ्ठलाची आली ॥१॥
नामा म्हणे जनी पाहे ।
द्वारीं उभा कोण आहे ॥२॥
प्रभा घरांत दाटली ।
एक सराद सुटली ॥३॥
एकमेकां आलिंगन ।
नामा म्हणे जनी धन्य ॥४॥
एक प्रहर रात्र झाली ।
फेरी विठ्ठलाची आली ॥१॥
नामा म्हणे जनी पाहे ।
द्वारीं उभा कोण आहे ॥२॥
प्रभा घरांत दाटली ।
एक सराद सुटली ॥३॥
एकमेकां आलिंगन ।
नामा म्हणे जनी धन्य ॥४॥