जनीचिया बोलें करी नित्य काम । वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥ जनीचिया गोष्टी प्रेम ज्याचे मनीं । तयाचे चरणीं ओढवी माथा ॥२॥ महेशादिदेव तेहि तया ध्याती । जे आवडे गाती जनी ध्याती ॥३॥