Categories: जनाबाई

राना गेली शेणीसाठीं – संत जनाबाई अभंग – ४९

राना गेली शेणीसाठीं – संत जनाबाई अभंग – ४९

राना गेली शेणीसाठीं ।
वेंचूं लागे विठो पाठी ॥१॥
पितांबर ओचे खोंवी ।
पायीं शोभा पारखावी ॥२॥
रिती बांधितांचि मोट ।
जनी म्हणे द्यावी भेट ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

राना गेली शेणीसाठीं – संत जनाबाई अभंग – ४९