Categories: जनाबाई

जनी जाय शेणासाठीं – संत जनाबाई अभंग – ४८

जनी जाय शेणासाठीं – संत जनाबाई अभंग – ४८

जनी जाय शेणासाठीं ।
उभा आहे तिच्या पाठीं ॥१॥
पितांबराची कांस खोवी ।
मागें चाले जनाबाई ॥२॥
गौर्‍या वेंचुनि बांधिली मोट ।
जनी म्हणे द्यावी गांठ ॥३॥
मोट उचलून डोईवर घेई ।
मागें चाले जनाबाई ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जनी जाय शेणासाठीं – संत जनाबाई अभंग – ४८