धुणें घेऊनि कांखेसी – संत जनाबाई अभंग – ४७
धुणें घेऊनि कांखेसी । जनी गेली उपवासी ॥१॥ मार्गे विठ्ठल धांवला । म्हणे कां टाकिलें मला ॥२॥ कां गा धांवोनि आलासी । जाय जाय राउळासी ॥३॥ चहूं हातें धुणें केलें । जनी म्हणे बरें झालें ॥४॥