आतां पुरे हा संसार । कोठें फेडूं उपकार ॥१॥ सांडूनियां थोरपण । करी दळण कांडण ॥२॥ नारिरुप होउनी हरी । माझें न्हाणें धुणें करी ॥३॥ राना जाये वेंची शेणी । शेखीं वाहे घरीं पाणी ॥४॥ ठाव मागें पायापाशीं । म्हणे नामयाची दासी ॥५॥