जाय जाय राउळासी – संत जनाबाई अभंग – ४५
जाय जाय राउळासी । नको येऊं आह्मांपाशीं ॥१॥ जाऊं आह्मी बरोबर । झाला तिचा हो चाकर ॥२॥ तिजसंगें काम करी । ऐसा जाणा देव हरी ॥३॥ चहूं हातीं धुणें केलें । जनी म्हणें बरें झालें ॥४॥