काकड आरती । करावया कमळापती ॥१॥ भक्त मिळाले सकळ । रितें देखिलें देउळ ॥२॥ ज्ञानेश्वर बोले । आतां देव कोठें गेले ॥३॥ ठावें जाहलें अंतरीं । देव दळी जनी घरीं ॥४॥