मग हांसोनि सकळी । पाहूं देव कैसा बळी ॥१॥ आले नामदेवा घरीं । प्रेमें भुललासे हरी ॥२॥ घाली जातिया वैरण । गाय आवडीचें गाण ॥३॥ पुढें देखे ज्ञानेश्वरा । देव झालासे घाबरा ॥४॥ जनी म्हणे पंढरिनाथा । जाय राउळासी आतां ॥५॥