दळण्याच्या भिषें । विठ्ठल सावकाशें ॥१॥ देहबुद्धीचें वैरण । द्वैत खंडारे निसून ॥२॥ एकलीच मातां । दुजा साद उमटतां ॥३॥ कोण तुझे बरोबरी । साद देतो निरंतरी ॥४॥ खूण कळली नामदेवा । विठ्ठल श्रोता जनीच्या भावा ॥५॥