कोणे एके दिवशीं – संत जनाबाई अभंग – ३९
कोणे एके दिवशीं ।
विठो गेला जनीपाशीं ॥१॥
हळूच मागतो खायासी ।
काय देऊं बा मी तुसी ॥२॥
हातीं धरुन नेला आंत ।
वाढी पंचामृत भात ॥३॥
प्रेमसुखाचा ढेंकर दिला ।
जनी म्हणे विठो धाला ॥४॥
कोणे एके दिवशीं – संत जनाबाई अभंग – ३९
कोणे एके दिवशीं ।
विठो गेला जनीपाशीं ॥१॥
हळूच मागतो खायासी ।
काय देऊं बा मी तुसी ॥२॥
हातीं धरुन नेला आंत ।
वाढी पंचामृत भात ॥३॥
प्रेमसुखाचा ढेंकर दिला ।
जनी म्हणे विठो धाला ॥४॥