मांडियेला डाव – संत जनाबाई अभंग – ३७मांडियेला डाव ।
कौरवांनीं दुष्ट भाव ॥१॥ टाकियेला फांसा । पांडव गेले वनवासा ॥२॥ वना गेले पांडवबळी । दिनकरें दिधली थाळी ॥३॥ पांडवांची कृष्णाबाई । जनी म्हणे माझी आई ॥४॥