बाप श्रोतियाचा राजा । कैसी उभारिली ध्वजा ॥१॥ एक झाला परिक्षिती । ऐसे पवाडे गर्जिती ॥२॥ भागवतीं रससुखें । द्रौपदी वाढी सावकाशें ॥३॥ ज्याची ऐकतां गर्जना । कंप काळाचिया मना ॥४॥ सात दिवस वृष्टि झाली । जनी म्हणे मात केली ॥५॥