Categories: जनाबाई

देहाचा पालट विठोबाचे – संत जनाबाई अभंग – ३५१

देहाचा पालट विठोबाचे – संत जनाबाई अभंग – ३५१

देहाचा पालट विठोबाचे भेटी ।
जळ लवणा गांठीं पडोन ठेली ॥१॥
धन्य मायबाप नामदेव माझा ।
तेणें पंढरिराजा दाखविलें ॥२॥
रात्रंदिवस भाव विठ्‌ठलाचे पायीं ।
चित्त ठायींचे ठायीं मावळलें ॥३॥
नामयाचे जनी आनंद पैं झाला ।
भेटावया आला पांडुरंग ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देहाचा पालट विठोबाचे – संत जनाबाई अभंग – ३५१