खांदीऋषि तो चालिला । बळीनें द्वारपाळ केला ॥१॥ ऐसा भक्ता आधिन होसी । त्याच्या वचनें वर्तसी ॥२॥ कष्टी होतां अंबऋषी । त्याचे गर्भवास सोसी ॥३॥ सर्व दुःखासी साहिलें । जनी म्हणे दळण केलें ॥४॥