धन्य ते पंढरी धन्य – संत जनाबाई अभंग – ३४९
धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ ।
तेणें हो पतीत उद्धरिले ॥१॥
धन्य नामदेव धन्य पंढरिनाथ ।
तयानें अनाथ उद्धरिले ॥२॥
धन्य ज्ञानेश्वर धन्य त्याचा भाव ।
त्याचे पाय देव आह्यां भेटी ॥३॥
नामयाची जनी पालट पैं झाला ।
भेटावया आला पांडुरंग ॥४॥
सुदेवाडसर पी़ जी.मला आत्मज्ञन मानवीदेहयावरील अंभग व पदे पाहिजे