माझिये जननी हरिणी । गुंतलीस कवणे वनीं ॥१॥ मुकें तुझें मी पाडस । चुकलें माये पाहें त्यास ॥२॥ चुकली माझिये हरिणी । फिरतसे रानोरानीं ॥३॥ आतां भेटवा जननी । विनवितसे दासी जनी ॥४॥