माझिये जननी हरिणी – संत जनाबाई अभंग – ३४८
माझिये जननी हरिणी ।
गुंतलीस कवणे वनीं ॥१॥
मुकें तुझें मी पाडस ।
चुकलें माये पाहें त्यास ॥२॥
चुकली माझिये हरिणी ।
फिरतसे रानोरानीं ॥३॥
आतां भेटवा जननी ।
विनवितसे दासी जनी ॥४॥
माझिये जननी हरिणी ।
गुंतलीस कवणे वनीं ॥१॥
मुकें तुझें मी पाडस ।
चुकलें माये पाहें त्यास ॥२॥
चुकली माझिये हरिणी ।
फिरतसे रानोरानीं ॥३॥
आतां भेटवा जननी ।
विनवितसे दासी जनी ॥४॥