कां गे निष्ठुर झालीसी । मुक्या बाळातें सांडिसी ॥१॥ तुज वांचोनिया माये । जीव माझा जावों पाहे ॥२॥ मी वत्स माझी माय । नये आतां करुं काय ॥३॥ प्राण धरियेला कंठीं । जनी ह्मणे देंई भेटी ॥४॥