आतां वाट पाहूं किती । देवा रुक्माईच्या पती ॥१॥ येंई येंई पांडुरंगे । भेटी देंई मजसंगें ॥२॥ मी बा बुडतें बहु जळीं । सांग बरवी ब्रीदावळी ॥३॥ राग न धरावा मनीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥