काय करूं पंढरीनाथा । काळ साह्य नाहीं आतां ॥१॥ मज टाकिलें परदेशीं । नारा विठा तुजपाशीं ॥२॥ श्रम बहु झाला जीवा । आतां सांभाळीं केशवा ॥३॥ कोण सखा तुजवीण । माझें करी समाधान ॥४॥ हीन दीन तुझे पोटीं । जनी ह्मणे द्यावी भेटी ॥५॥