काय करूं पंढरीनाथा – संत जनाबाई अभंग – ३४१
काय करूं पंढरीनाथा ।
काळ साह्य नाहीं आतां ॥१॥
मज टाकिलें परदेशीं ।
नारा विठा तुजपाशीं ॥२॥
श्रम बहु झाला जीवा ।
आतां सांभाळीं केशवा ॥३॥
कोण सखा तुजवीण ।
माझें करी समाधान ॥४॥
हीन दीन तुझे पोटीं ।
जनी ह्मणे द्यावी भेटी ॥५॥