गजेंद्रासी उद्धरिलें । आह्मीं तुझें काय केलें ॥१॥ तारिली गणिका । तिहीं लोकीं तुझा शिक्का ॥२॥ वाल्हा कोळी अजामेळ । पापी केला पुण्यशीळ ॥३॥ गुणदोष मना नाणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥