शरण आलों नारायणा । आतां तारीं हो पावना ॥१॥ शरण आला मारुतिराया । त्याची दिव्य केली काया ॥२॥ शरण प्रल्हाद तो आला । हिरण्यकश्यपू मारिला ॥३॥ जनी ह्मणे देवा शरण । व्हावें भल्यानें जाणोन ॥४॥