शरण आलों नारायणा – संत जनाबाई अभंग – ३३७
शरण आलों नारायणा ।
आतां तारीं हो पावना ॥१॥
शरण आला मारुतिराया ।
त्याची दिव्य केली काया ॥२॥
शरण प्रल्हाद तो आला ।
हिरण्यकश्यपू मारिला ॥३॥
जनी ह्मणे देवा शरण ।
व्हावें भल्यानें जाणोन ॥४॥
शरण आलों नारायणा ।
आतां तारीं हो पावना ॥१॥
शरण आला मारुतिराया ।
त्याची दिव्य केली काया ॥२॥
शरण प्रल्हाद तो आला ।
हिरण्यकश्यपू मारिला ॥३॥
जनी ह्मणे देवा शरण ।
व्हावें भल्यानें जाणोन ॥४॥