येंई जीवाचिया जीवा । रामा देवाचिया देवा ॥१॥ सर्व देव बंदीं पडिले । रामा तुझी सोडविले ॥२॥ मारुनियां लंकापती । सोडविली सीता सती ॥३॥ देवा तुमची ऐसी ख्याती । रुद्रादिक ते वर्णिती ॥४॥