अहो ब्रह्मांड पाळका । ऐकें रुक्मिणीच्या कुंका ॥१॥ देवा घेतलें पदरीं । तें तूं टाकूं नको दुरी ॥२॥ होतें लोकांमध्यें निंद्य । तें त्वां जगांत केलें वंद्य ॥३॥ विनवीतसे दासी जनी । परिसावी माझी विनवणी ॥४॥