अहो ब्रह्मांड पाळका – संत जनाबाई अभंग – ३३४
अहो ब्रह्मांड पाळका ।
ऐकें रुक्मिणीच्या कुंका ॥१॥
देवा घेतलें पदरीं ।
तें तूं टाकूं नको दुरी ॥२॥
होतें लोकांमध्यें निंद्य ।
तें त्वां जगांत केलें वंद्य ॥३॥
विनवीतसे दासी जनी ।
परिसावी माझी विनवणी ॥४॥