रुक्मिणीच्या कुंका । सुरां अमरां प्रिय लोकां ॥१॥ तूं धांव माझे आई । सखे साजणी विठाबाई ॥२॥ शिवाचिया जपा । मदनताता या निष्पापा ॥३॥ दयेच्या सागरा । ह्मणे जनी अमरेश्वरा ॥४॥