Categories: जनाबाई

पोट भरुनी व्यालासी – संत जनाबाई अभंग – ३२१

पोट भरुनी व्यालासी – संत जनाबाई अभंग – ३२१

पोट भरुनी व्यालासी ।
मज सांडुनी कोठें जासी ॥१॥
धिरा धिरा पांडुरंगा ।
मज कां टाकिलें निःसंगा ॥२॥
ज्याचा जार त्यासी भार ।
मजला नाहीं आणिक थार ॥३॥
विठाबाई मायबहिणी ।
तुझे कृपें तरली जनी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पोट भरुनी व्यालासी – संत जनाबाई अभंग – ३२१