हा दीनवत्सल महाराज । जनासवें काय काज ॥१॥ तुझी नाहीं केली सेवा । दुःख वाटे माझ्या जिवा ॥२॥ रात्रंदिवस मजपाशीं । दळूं कांडूं तूं लागसी ॥३॥ जें जें दुःख झालें मला । तें तें सोसिलें विठ्ठला ॥४॥ क्षमा कीजे पंढरिराया । दासी जनी लागे पायां ॥५॥