अगा रुक्मिणीनायका । सुरा असुरा प्रिय लोकां ॥१॥ ते तूं धांवें माझे आई । सखे साजणी विठाबाई ॥२॥ अगा शिवाचिया जपा । मदन ताता निष्पापा ॥३॥ आपुली म्हणवुनी । अपंगावी दासी जनी ॥४॥