कां गा न येसी विठ्ठला – संत जनाबाई अभंग – ३११
कां गा न येसी विठ्ठला ।
ऐसा कोण दोष मला ॥१॥
मायबाप तूंचि धनी ।
मला सांभाळीं निर्वाणीं ॥२॥
त्वां बा उद्धरिले थोर ।
तेथें किती मी पामर ॥३॥
दीनानाथा दीनबंधू ।
जनी ह्मणे कृपासिंधू ॥४॥
कां गा न येसी विठ्ठला ।
ऐसा कोण दोष मला ॥१॥
मायबाप तूंचि धनी ।
मला सांभाळीं निर्वाणीं ॥२॥
त्वां बा उद्धरिले थोर ।
तेथें किती मी पामर ॥३॥
दीनानाथा दीनबंधू ।
जनी ह्मणे कृपासिंधू ॥४॥