गंगा गेली सिंधुपाशीं – संत जनाबाई अभंग – ३०८
गंगा गेली सिंधुपाशीं ।
त्याणें अव्हेरिलें तिसी ॥१॥
तरी तें सांगावें कवणाला ।
ऐसें बोलें बा विठ्ठला ॥२॥
जळ काय जळचरा ।
माता अव्हेरी लेंकुरा ॥३॥
जनी ह्मणे शरण आलें ।
अव्हेरितां ब्रीद गेलें ॥४॥
गंगा गेली सिंधुपाशीं ।
त्याणें अव्हेरिलें तिसी ॥१॥
तरी तें सांगावें कवणाला ।
ऐसें बोलें बा विठ्ठला ॥२॥
जळ काय जळचरा ।
माता अव्हेरी लेंकुरा ॥३॥
जनी ह्मणे शरण आलें ।
अव्हेरितां ब्रीद गेलें ॥४॥