येगे माझे विठाबाई । कृपादृष्टीनें तूं पाहीं ॥१॥ तुजविण न सुचे कांहीं । आतां मी वो करुं कांहीं ॥२॥ माझा भाव तुजवरी । आतां रक्षीं नानापरी ॥३॥ येई सखये धांउनी । ह्मणे नामयाची जनी ॥४॥