पाय जोडूनि विटेवरी । कर ठेउनी कटावरी ॥१॥ रुप सांवळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकार ॥२॥ गळां माळ वैजयंती । पुढें गोपाळ नाचती ॥३॥ गरूड सन्मुख उभा । ह्मणे जनी धन्य शोभा ॥४॥