तुझ्या निजरुपाकारणें । वेडावलीं षड्दर्शनें ॥१॥ परि सोय न कळे त्यांसी । समीप असतां देवासीं ॥२॥ चारीश्रमें हो कष्टती । वेदशास्त्रें धुंडाळिती ॥३॥ परि कवणें रीति तुला । न जाणवे जी विठ्ठला ॥४॥ तुझी कृपा होय जरी । दासी जनी ध्रुपद करी ॥५॥