नोवरीया संगें वर्हाडीया सोहोळा । मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥ परीसाचेनीसंगें लोहो होय सोनें । तयाचीं भूषणें श्रीमंतासी ॥२॥ जनी ह्मणे जोड झाली विठोबाची । दासी नामयाची म्हणोनियां ॥३॥