एकटी तूं गाणें गासी । दुजा शब्द उमटे पाशीं ॥१॥ कोण गे तुझ्या बरोबरी । गाणें गाती निरंतरीं ॥२॥ पांडुरंग माझा पिता । रखुमाई झाली माता ॥३॥ ऐशियाच्या घरीं आलें । जनी ह्मणे धन्य झालें ॥४॥