स्तन पाजायासी । आली होती ते माउसी ॥१॥ तिच्या उरावरी लोळे । विठो माझा क्रीडा खेळे ॥२॥ मेल्यें मेल्यें कृष्णनाथा । सोडीं सोडींरे अनंता ॥३॥ लिंग देह विरविरलें । जनी ह्मण विठ्ठलें ॥४॥