अनंत लावण्याची शोभा । तो हा विटेवरी उभा ॥१॥ पितांबर माल गांठीं । भाविकांसी घाली मिठी ॥२॥ त्याचे पाय चुरी हातें । कष्टलीस माझे माते ॥३॥ आवडी बोलें त्यासी । चला जाऊं एकांतासी ॥४॥ ऐसा ब्रह्मींचा पुतळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥